Uchchad drama will be launched in Pune on 4 February

प्रसाद कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ची ६० वी नाट्यकृती ‘उच्छाद’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवारी ४ फेब्रुवारीला रात्री ९.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार आहे. या नाटकाची निर्मिती कविता कांबळी, अमेय गोसावी यांची आहे.

‘उच्छाद’ हे विनोदी नाटक यास्मिना रेझा यांच्या ‘गॉड ऑफ कार्नेज’ या प्रसिद्ध फ्रेंच नाटकाचा निरंजन पेडणेकर यांनी केलेला मराठी अनुवाद असून दिग्दर्शन अनुपम बर्वे यांचे आहे. मुलांच्या खेळीच्या वातावरणात एका मुलाकडून दुसऱ्या मुलाचे दात तोडले जातात. मुलांनी केलेल्या किरकोळ भांडणाचा गुंता सभ्यपणे सोडवण्यासाठी एक जोडपं दुसऱ्या जोडप्याला घरी बोलवतं. पण ही बैठक हळूहळू एका वेगळ्याच दिशेने जाऊन सभ्यतेचे बुरखे कसे फाडते, हे या नाटकात आपल्याला पहायला मिळणार आहे.

कलाकार सायली फाटक, तन्वी कुलकर्णी, निरंजन पेडणेकर, सिद्धेश धुरी असून नाटकाचे नेपथ्य पूर्वा पंडित, प्रकाशयोजना यश पोतनीस व स्वच्छंद, रंगभूषा आणि वेशभूषा आशिष देशपांडे यांनी केली आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *