Vijay Supekar as President of Karmala Group Level Industrial Multi Purpose Rural InstituteVijay Supekar as President of Karmala Group Level Industrial Multi Purpose Rural Institute

करमाळा : करमाळा गट पातळीवरील औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली आहे. आज (गुरुवारी) सहाय्यक निंबधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी श्री. माने यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदाची निवड झाली. यावेळी संस्थेचे संचालक विजय सुपेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी माने यांनी त्यांची बिनविरोध निवड केली तर उपाध्यक्षपदी हनुमंत अवघडे यांचाही एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली.

आज सकाळी ११ वाजता सहाय्यक निंबधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात निवडणुक बिनविरोध झाली. यावेळी संस्थेचे संचालक राजेंद्र कुंभार, लक्ष्मण परदेशी, रमेश चांदणे, भैरवनाथ अडसुळ, दादा पालवे, सुधीर चव्हाण, शंकुतला जगताप, नंदा जगताप तसेच संस्थेचे सचिव अल्ताफ शेख आदी जण उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *