We organized Pandhari Cyclothon in Pandhari on behalf of Pandharpurkar Foundation and District Cycle Association of Solapur

पंढरपूर : आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकल असोशिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने पंढरीत पहाटे साडेसहा वाजता तब्बल 2500 सायकलस्वार स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या भव्य अशी पंढरी सायक्लोथॉन 2024 संपन्न झाली.

श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील व जिल्हा सायकल असोशिएशन ऑफ सोलापूरचे अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सायकक्लोथॉनचा शुभारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही सायक्लोथॉन स्टेशन रोड मार्गे चौक- प्रबोधनकार ठाकरे चौक, लिंकरोड मार्गे क्रांतीसिंह नाना पाटील चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक चौक, भादुले चौक ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा पध्दतीने संपन्न झाली.

यामध्ये श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनीही सायकल चालवून उत्सफुर्तपणे सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात संगीताच्या तालावर नृत्य करत सहभागी विद्यार्थी व तरुणांनी ठेका धरला तेंव्हा चेअरमन अभिजीत पाटील यांनीही त्यांच्यासोबत मनसोक्त फेर धरत नृत्य केले. हल्लीच्या काळात अबाल वृध्दांमध्ये सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी तसेच प्रदुषणमुक्तीसह इंधन बचत होणेसाठी यासाठी आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकलींग असोशिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने भरवण्यात येणारी ही सायक्लोथॉन निश्‍चितच पंढरपुरकरांसाठी आनंदाची पर्वणी असल्याचे मत यावेळी बोलताना चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या प्रत्येक कार्यासाठी सहकार्य करण्याचं अभिवचन दिलं. तसेच यापुढे राज्यस्तरीय सायकलोथॉन स्पर्धेचं आयोजनही लवकरंच करणार असल्याचं जाहीर केलं.

यावेळी सहभागी स्पर्धकांना व स्वयंसेवकांना मोफत टीशर्ट, प्रमाणपत्रं देण्यात आले, तसेच खाऊ वाटपही करण्यात आले. या सायक्लोथॉनमध्ये स्वेरी इंजिनिअरींग कॉलेज, गोपाळपूर, ता.पंढरपूर चे प्रा.यशपाल खेडकर सरांसह या संस्थेतील दीडशे विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून महत्वाची भुमिका बजावली. यावेळी श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, जिल्हा सायकल असोशिएशन ऑफ सोलापूरचे अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिगंबर तात्या सुडके, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, माजी नगरसेवक विवेक परदेशी, धनंजय कोताळकर, अ‍ॅड.अमोल नागटिळक, सायकलपटू महेश भोसले, विकास शेळके, समीर कोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम, विश्वस्त राधेश बादले-पाटील (साहित्यीक), दिगंबर भोसले, सतीश माने,गणेश थिटे, शेखर भोसले, विठ्ठल भुमकर, निलेश कदम, नवनाथ बाबर, गणेश निंबाळकर, स्वप्नील साठे, गणेश जाधव, सोमनाथ शिंदे, सिध्दार्थ गुरव, ओंकार चव्हाण, विजय पाटील, विशाल शेळके, युवराज कदम, बिपीन देवमारे, जितु काळे आदींनी ही सायक्लोथॉन यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *