करमाळा (सोलापूर) : गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या निमीत्ताने करमाळा शहरात पोलिसांकडून आज (गुरुवारी) सकाळी ‘रूट मार्च’ काढण्यात आला. गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून करमाळा पोलिस अलर्ट आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक झाली होती. त्यानंतर आता रूटमार्च काढण्यात आला. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. राशीन रोड, मेन रोड, वेताळ पेट, किल्ला विभाग येथून हा रूट मार्च काढण्यात आला. यावेळी करमाळा पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व पोलिस बांधव उपस्थित होते.
