वांगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बाल आनंद बाजार

Bal Anand Bazar at Zilla Parishad School in Wangi

करमाळा (सोलापूर) : वांगी नंबर 3 येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद बाजार मेळावा भरवण्यात आला होता. याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय रोकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुण म्हणून सरपंच मयूर रोकडे होते.

उपाध्यक्ष लक्ष्मण गोडसे, मारुती रोकडे, दत्ता मेनकुदळे, यशवंत भवर, जयवंत सातव, नागेश खराडे, मनोज तळेकर, बाळासाहेब कांबळे, प्रकाश तेलंग, नागनाथ वाघमोडे आदी यावेळी उपस्थित होते. येथील बाजारात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी फळे, पाले- भाज्या, अंडी, वडापाव, भजी, चायनीज, भेळ, चहाची दुकाने लावली होती.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आदिनाथ राऊत, उज्वला भोंग, अशोक कणसे, बाळू राठोड व सुतार मॅडम यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *