A case has been registered against nine people in Karmala police for beating up one person in AwatiA case has been registered against nine people in Karmala police for beating up one person in Awati

करमाळा (सोलापूर) : माझ्या भावाला कट का मारला म्हणत एकाला बेदम मारहाण झाली असल्याचा प्रकार तालुक्यातील आवाटी येथे घडला आहे. यामध्ये नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जाकीर पटेल, सोहेल अफसर जहागीरदार, अरबाज सय्यद, अमन जाकीर पटेल, सलमान युसुफ पटेल, लतीफ रज्जाक पटेल, तुषार भारत सूळ, गणेश खांडेकर व फिरोज जहागीरदार (सर्व रा. आवटी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये मोहसीन बडेमिया खान (वय ३०, व्यावसाय शेती) यांनी फिर्यादी केली आहे.

खान यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (ता. ४) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास तेथील हॉटेलमध्ये पाण्याची बाटली आणण्यासाठी गेलो होतो. तेव्हा पाण्याची बाटली घेऊन जात असताना गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी जाकीर पटेल याने मला हाक मारून बोलावून घेतले. तेव्हा तो म्हणाला ‘तू माझ्या भावाला गाडीवरून कट का मारला?’ त्यावर फिर्यादी खान ‘कट मारला नाही’, असे सांगत असताना त्याने हाताने मारहाण केली. त्यानंतर सोहेलने चाकूने डोक्याच्या डाव्या बाजूला कानाजवळ मारून जखमी केले. अरबाजने लोखंडी गजाने पाठीवर, पायावर मारून जखमी केले. अमन व सलमान यांच्यासह गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

सोहेलने मानेवर पाय दिला व फिरोज याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या डोळ्याला मार लागला आहे. त्यांच्या खिशातील 20 हजार रुपये व मोबाईल भांडणांमध्ये पडून गाळ झाला आहे. त्यानंतर फिर्यादी जखमीला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथे दाखल केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *