That woman in the Chavan murder case of Nashik district is still absconding

करमाळा (सोलापूर) : मांगी येथील कुकडी कॅनलजवळ एका कारमध्ये अडळून आलेल्या गाडीतील एकाचा मृत्यूदेह हा खूनच असून यामध्ये तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुनिल घाडगे, त्याची पत्नी व भाऊ असे हे तिन संशयित आहेत. श्रावण रघुनाथ चव्हाण (वय ३८, रा. अडसुरे, ता. येवला, जि. नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. करमाळा पोलिसांनी याचा २४ तासाच्या आत तपास करुन गुन्हा दाखल केला असून एकजण ताब्यात घेतला असल्याची माहिती मिळत आहे. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिठू जगदाळे हे करत आहेत. अनैतिकसंबंधातून हा खून झाला आहे. खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हा मृतदेह येथे आणला असावा असा संशय आहे. पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे. संबंधित खून झालेल्या व्यक्तीची येवला ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद झाली होती. त्यानंतर याचा तपास सुरु होता. दरम्यान करमाळा ते नगर महामार्गावरील मांगी येथील कुकडी कॅनेलजवळ एक कार उभा होती. त्यात जळलेल्या अवस्थेत हा मृतदेह अढळून आला होता. सरकारी पंच म्हणून लिपीक रमीझ शेख, कालवा चौकीदार दत्तात्रय गोडगे यांनी काम पाहिले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *