Comedian Naveen Prabhakar will perform a special show on 14 January

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमातील ‘पहचान कौन’ या अभिनयासाठी ओळखला जाणारा कॉमेडियन म्हणजे नवीन प्रभाकर! स्टँडअप कॉमेडी असो किंवा गायन, अभिनय असो नेहमीच नवीनने प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला आहे. तसेच ‘बॉम्बे टू गोवा’, ‘खिलाडी 786’ आणि ‘फाटा पोस्टर निखला हिरो’ यांसारख्या अनेक बॉलीवूड चित्रपटात तसेच ‘सोहम’, ‘आपडी थापडी’ आदी मराठी चित्रपटात देखील त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हा कॉमेडी किंग पुणेकरांना हसवायला येत आहे.

आर. एम. इव्हेंट्स आणि मोना सिंग यांच्या वतीने कॉमेडी किंग नवीन प्रभाकर याचा ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर कॉमेडी नाईट्स’ हा विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथील एलप्रो सिटी स्क्वेर मॉल येथे, सायंकाळी 6 वा. हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नवीन सोबत ‘भाबिजी घर पर हे’ फेम प्रेम चौधरी आणि ‘वेंत्रिलो क्युस्ट’ मधील राजकुमार रॅन्चो या दोघांचा देखील सहभाग असणार आहे. त्यामुळे विनोदाचा आनंद द्विगुणिक होणार यात शंका नाही.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *