--

अशोक मुरूमकर, करमाळा

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता राजकीय राजकीय वर्तुळात आहे. मात्र या मतदारसंघात कोणालाही उमेदवारी मिळाली करमाळा विधानसभा मतदारसंघात तीनविरुद्ध एक गट असेच चित्र राहील. त्याचा विधानसभेवर थेट परिणाम होणार आहे.

माढा लोकसभा मतदार संघात करमाळा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात पक्षापेक्षा स्थानिक गटावर जास्त राजकारण चालते. आमदार संजयमामा शिंदे यांचा शिंदे गट, माजी आमदार नारायण पाटील यांचा पाटील गट, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट व माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल मामा यांचा बागल गट. बागल गटाचे नेतृत्व हे भाजपच्या रश्मी बागल व मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे करत आहेत. या चार प्रमुख गटांसह मोहिते पाटील समर्थक देखील येथे आहेत. डॉ. अमोल घाडगे व अमरजित साळुंखे हे येथे गट वाढवण्यासाठी काम करत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंड करतील, अशी चर्चा आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांच्यावर नाराजी व्यक्त करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून ‘तुतारी’ घ्यावी, असा सूर मोहिते पाटील समर्थकांचा आहे. माजी आमदार नारायण पाटील हे देखील मोहिते पाटील यानांच मानतात. त्यांचे नेतृत्व मान्य करत ते करमाळा विधानसभा मतदार संघात काम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पाठींबा दिला होता. मात्र पुढे स्थानिक राजकारणात त्यांच्यावरच अन्याय झाला, असे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनीही पाटील समर्थकांच्या स्वतंत्र बैठका घेऊन आढावा घेतला आहे. त्यातही ‘तुतारी’चाच सूर निघाल्याची चर्चा आहे. त्यामुळे माजी आमदार पाटील काय निर्णय घेतील हे महत्वाचे आहे.
माढ्याचा तिढा सुटणार? अजितदादांनी बोलावली राष्ट्रवादीच्या आमदारांची पुण्यात बैठक

आमदार संजयमामा शिंदे हे गेल्या लोकसभा निवडणुकीत निंबाळकर यांच्याविरुद्ध रिंगणात होते. त्यानंतर करमाळा मतरसंघात ते अपक्ष उतरले आणि विजयी झाले. ते सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नेते मानतात. त्यांच्या माध्यमातून त्यांनी करमाळा मतदारसंघात विकासही केला आहे. त्यांनीही गावनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. मात्र त्या बैठकीत ‘मामा जो आदेश देतील तो आम्ही पाळणार असल्याचे सांगत मताधिक्य देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.’ त्यामुळे आमदार शिंदे हे निंबाळकर यांचे प्रामाणिकपणे काम करतील असे चित्र आहे.
Madha Loksbha भाजपच्या निंबाळकरांच्या प्रचाराचा मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात नारळ फुटणार

बागल गटाने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षभरापासून ते भाजपशी जवळीक वाढवीत होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आणि निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी त्यांनी कामही सुरु केले आहे. मोहिते पाटील यांच्याशी त्यांची जवळीक आहे. निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेले मोहिते पाटील यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर बागल काय भूमिका घेतील, हे पहावे लागणार आहे. मात्र तरीही ते भाजपचेच काम करतील असे चित्र आहे.
Video मराठा समाजाकडून माढा मतदारसंघात प्रा. झोळ यांच्या नावाची चर्चा

जगताप गटाचे नेतृत्व हे माजी आमदार जगताप हे करत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतही जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या माध्यमातून त्यांनी निंबाळकर यांचेच काम केले होते. त्यानंतरही त्यांनी निंबाळकर यांच्याशी जवळीक ठेवली होती. त्यामुळे यावेळी ते भाजपचे काम करतील यात कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही, असे बोलले जाते.
भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतील?

गेल्या निवडणुकीत खासदार निंबाळकर विरुद्ध आमदार शिंदे यांच्यात लढत झाली होती. तेव्हा शिंदेंबरोबर बागल होते. निंबाळकर यांच्याबरोबर पाटील व जगताप होते. आता निंबाळकर यांच्याबरोबर आमदार शिंदे, माजी आमदार जगताप व बागल हे उघडपणे आहेत. तर माजी आमदार नारायण पाटील काय भूमिका घेतील हे पहावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे, पाटील, जगताप व बागल या चार गटांचा विचार केला तर तीन गटविरुद्ध एक गट असे चित्र आहे. मात्र पाटील गट काय भूमिका घेणार हे महत्वाचे असून याचा परिणाम विधानसभेवर कसा होणार हे पहावे लागणार आहे. या निवडणुकीत मराठा समाज आणि सामान्य मतदार यांचा निर्णयही महत्वाचा ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करमाळा तालुक्यातून मताधिक्य देणार : संतोष वारे

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *