करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सध्या वातावरण तापलेले आहे. त्यातच प्रत्येक गावातून एक उमेदवारी देण्याची चर्चा सुरु असतानाच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक मतदार संघात अपक्ष उमेदवार देण्याची सूचना केली होती. त्यावरून माढा लोकसभा मतदारसंघात दत्तकला शिक्षण समूहाचे प्रा. रामदास झोळ यांनी निवडणूक लढवावी अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
माढा लोकसभा मतदार संघात करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, माण व फलटण हे विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीने मात्र अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यातच मराठा समाजाकडून प्रा. झोळ यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, अशी मागणी सोशल मीडियावर सुरु आहे.
भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतील?
प्रा. झोळ यांची भिगवण येथे शिक्षण संस्था आहे. त्यांच्या पत्नी माया झोळ यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या वाशिंबे ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक तानाजी झोळ यांनी त्यांचा सरपंच पदावर पराभव केला होता. प्रा. झोळ यांनी करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या गटातील पॅनेलला विरोध करत पॅनेल देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संपूर्ण पॅनेल ते देऊ शकले नव्हते.
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलन उभा केले होते. अजूनही त्यांचा लढा सुरूच आहे. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे यांनी केलेल्या आंदोलनालाही त्यांनी पाठींबा दिला होता. मुंबईला जाण्यासाठी त्यांनी १०० गाड्या देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दिवेगव्हाण येथे झालेल्या जरांगे यांच्या सभेलाही त्यांनी मदत केली होती. करमाळ्यात जरांगे यांच्या समर्थनात झालेल्या साखळी उपोषणातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. आता त्यांनी समाजासाठी केल्या कामाची दखल घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु झाली आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करमाळा तालुक्यातून मताधिक्य देणार : संतोष वारे
जिथे हुलगे पिकत नव्हते तेथे आता ‘सोनं’ पिकतय… आता मामा म्हणतील तसंच करणार, खासदार निंबाळकरांसमोर पदाधिकार्यांनी व्यक्त केली भावना
करमाळा तालुक्यातील प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार निंबाळकर यांचे आमदार शिंदे यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांना आश्वासन