करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मोरवड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर झाले. यावेळी चष्मे वाटपही करण्यात आले. शिबिरामध्ये शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांचे डोळे तपासण्यात आले. यावेळी आवश्यकतेनुसार काहींना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. ज्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे अशाना पुणे येथे मोफत ऑपरेशन करून देण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, उपाध्यक्ष बंडू शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, जयंत काळे पाटील, प्रसाद गेंड, हर्षद गाडे, धर्मराज नाळे, बजरंग मोहोळकर, दादा काळे, भरत नाळे, गहीनीनाथ नाळे, दत्ता काळे, अशोक काळे, उद्धव नाळे, रामचंद्र नाळे, आजिनाथ नाळे, बाबासाहेब नाळे, राजेंद्र मोहोळकर, बापू काळे, सागर काळे, शिवाजी नाळे, केशव शिंदे, महेंद्र नाळे, नामदेव शिंदे, छगन मोहोळकर आदी उपस्थित होते.
