Treatment of former MLA Jaywantrao Jagtap started in Barshit Improvement in health

भाजपचे जिल्हाध्यक्ष (माढा) चेतनसिह केदार सावंत यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये विशेष निमंत्रित सदस्यांच्या यादीत करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना स्थान देण्यात आले आहे. तर माजी आमदार जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

२००० मध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी जगताप यांनी काँग्रेसमध्ये असताना भाजपबरोबर युती केली होती. २००९ मध्ये शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार असताना तत्कालीन आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय नुकसानीची पर्वा न करता स्वतःचे राजकीय भवितव्य पणाला लावत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा प्रचार केला होता.

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी जगताप गटाने युवानेते शंभूराजे जगताप यांचे नेत्तृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राजेंद्र राऊत, खासदार रणजितसिह निंबाळकर, रणजीतसिह मोहिते पाटील, सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात भाजपमधे प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूकीमध्ये त्यावेळी निंबाळकर यांच्या प्रचारात शंभुराजे जगताप यांनी मोठा झंझावती प्रचार केला होता.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *