Inauguration of Revenue Week in Jinti Mandal by taking a ferry to the villageInauguration of Revenue Week in Jinti Mandal by taking a ferry to the village

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जिंती मंडळात आज (मंगळवारी) ‘महसूल सप्ताह’चा शुभारंभ झाला. महसूल विभागाने वर्षभर लोकाभिमुख केलेल्या कामाचा आढावा नागरिकांसमोर मांडण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा दिवस ‘महसूल दिन’ म्हणून साजरा केला जातो. नागरिकांना अधिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी ‘महसूल सप्ताह’ घेतला जाणार आहे. त्याचीच सुरुवात जिंती मंडळात झाली आहे.

जिंती महसूल मंडळात असणाऱ्या जिंती, भिलारवाडी, रामवाडी व हिंगणी येथे विद्यार्थ्यांनी गावातून फेरी काढत ई हक्क प्रणाली व मतदान नाव नोंदणी याबाबत जागृती केली. ‘ई हक्क प्रणाली’ ही लोकाभिमुख सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून महाईसेवा केंद्र चालक यांना प्रशिक्षण साहित्य व मार्गदर्शन करून जिंती मंडळातील सर्व महा ई सेवा केंद्र ही ई हक्क प्रणालीतील फेरफार नोंदीबाबत ‘नागरिक मदत कक्ष’ म्हणून जाहीर करून तसे फलक संबंधित महा ई सेवा केंद्राच्या दर्शनी भागात लावण्यात आले. सर्व तलाठी कार्यालयातही याबाबत मार्गदर्शन उपलब्ध राहील, असे मंडळ अधिकारी संतोष गोसावी यांनी सांगितले.

मतदार जागृतीच्या अनुषंगाने नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, नावात चुक- दुरूस्ती याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बॅंक मर्यादित, मुंबई व जिल्हा सहकारी ग्रामीण बहुद्देशीय विकास बॅंक (भूविकास बॅंक) संबंधी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील संबंधित कर्ज बोजा नोंद कमी करून दुरूस्त उतारा संबंधित शेतक-यांना देण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट पर्यंत या सप्ताहात विवीध कार्यक्रम होणार आहेत, असे मंडळ अधिकारी गोसावी यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिंतीचे तलाठी प्रबुद्ध माने, कात्रज व भिलारवाडीचे तलाठी सोमनाथ गोडसे, रामवाडीचे तलाठी संजय शेटे, हिंगणीचे तलाठी राहुल बडकणे, टाकळीचे तलाठी रामेश्वर चंदेल यांनी परिश्रम घेतले. केंद्र प्रमुख महावीर गोरे, जिंती परिसरातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, कोतवाल कमाल मुलाणी यांनीही यासाठी परिश्रम घेतले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *