पत्रकार शितलकुमार मोटे यांना पुण्यात राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना पुण्यात ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षचे माजी प्रमुख मंगेश चिवटे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे अधिसभा सदस्य प्रा. नितीन तळपाडे, महादेव वाघमारे, जगदीश ओहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार मोटे हे करमाळा तालुक्यातील पाथुर्डीचे आहेत. ग्रामीण भागात राहून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. पत्रकारिता करीत असताना राजकीय, सामाजिक, कृषीविषयक, शैक्षणिक, धार्मिक विषयाचे त्यांनी वार्तांकन केले आहे. जगदीशशब्द फाउंडेशनच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *