करमाळा (अशोक मुरुमकर) : मामा तुम्ही राष्ट्रवादी, भाजप किंवा कोणत्याही पक्षात रहा आमच्यासाठी ‘मामा हाच पक्ष आहे’ असे म्हणत जिल्हा दूध संघाचे संचालक अशोक पाटील यांनी स्व. दिगांबरराव बागल मामा यांची आठवण सांगितली.
तालुक्यातील हिंगणी येथील जल जीवन मिशन योजनेचे लोकार्पण आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले. आज (रविवारी) सायंकाळी हे लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन जाधव, हनुमंत पाटील हे आहेत. यावेळी शेतकरी मेळावाही झाला.
यावेळी अशोक पाटील म्हणाले, आमदार शिंदे यांनी करमाळा तालुक्यात विविध विकास कामे केली आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पक्षात असला किंवा गेलात तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. कारण आम्ही कायम तुमच्याबरोबर राहणार आहोत, आमच्यासाठी मामा हाच पक्ष आहे, असे ते म्हणाले.
हिंगणी येथे सुरु असलेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अॅड. राहुल सावंत, विलास पाटील, चंद्रहास निमगीरे, सुर्यकांत पाटील, अॅड. अजित विघ्ने, सुजित बागल, सरपंच किरण फुंदे, दत्तात्रय अडसुळ, भोजराज सुरवसे, अॅड. नितीनराजे भोसले, बाळकृष्ण सोनवणे, राजेंद्र बाबर, डॉ. गुळवे, राजेद्र धांडे, अशोक पाटील, सतिश शेळके, वारगड, विवेक येवले आदी उपस्थित होते.
(कार्यक्रम सुरु आहे सविस्तर बातमी काही वेळात)