शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीच्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये वर्धा मतदारसंघात अमर काळे, दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे, बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे, शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे व अहमदनगर मतदारसंघात निलेश लंके यांचे नाव जाहीर झाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे.

