नवी दिल्ली : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. तर ४ जूनला निकाल असणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये २६ एप्रिल, ७, १३, २० व २५ मे रोजी मतदान असणार आहे. यावेळी देशात महिला मतदारांची संख्या वाढली आहे. देशात साडेदहा लाख बूथ असणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह २६ जागांवर विधानसभांची पोटनिवडणूक यावेळी होणार आहे.
- पहिल्या टप्यातील १९ एफ्रिलला मतदान
- दुसऱ्या टप्यात २६ एफ्रिलला मतदान,
- तिसऱ्या टप्यात ७ मे रोजी मतदान
- चौथा टप्पा १३ मे रोजी मतदान
- पाचवा टप्पा २० मे रोजी मतदान
- सहावा टप्पा २५ मे रोजी मतदान
- सातवा टप्पा १ जूनला मतदान
–
- ८५ लाख वर्ष वयोगटावरील मतदार, ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार, फॉर्म १२ डी भरुन देणाऱ्यांना सुविधा
- ९७ कोटी मतदार या यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत
- यंदा १ कोटी ८२ लाख नवीन मतदार असणार आहेत. ५५ लाख एव्हीएम मशीन असणार आहेत आणि १ कोटी ५ लाख निवडणूक अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षक असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
- फुकट वाटल्या जाणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत
- निवडणुकीत व्यक्तिगत कोणीही टीका करू नये
- सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार
- प्रचार करताना नियमाचे पालन करा,
- दारू, साड्या वाटपावर होणार कारवाई
- खोट्या बातम्यांची खरी माहिती आम्ही सांगणार
- लहान मुलांचा प्रचारात वापर करू नये
- पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही