म्हसवड (अशोक मुरुमकर) : भाजपने यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन चुक केली आहे. आम्ही त्यांना यापूर्वी विजयी केले ही तेव्हा चुक केली आता आम्ही तशी चुक करणार नाही, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आम्ही आता विजयी करणार, असल्याचे प्रतिपादन वडुजचे माजी नगराध्यक्ष महेश गुरव यांनी केले. मराठा आरक्षणासाठी छत्रपती उदयनराजे यांनी सर्व खासदारांचे केंद्रात निवेदन दिले. मात्र त्या निवेदनावर निंबाळकरांनी सही केली नाही, याचा निषेध करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
म्हसवड येथे आज महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा झाला. प्रास्ताविक माजी सरपंच विजय जगताप यांनी केले.
आमदार शशिकांत शिंदे, दिलीप तुपे, सेवानिवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, महेश माने, राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे, सुनिल सावंत, प्रतिभा शिंदे, विशाल जाधव, निवृत्ती खताळ, अमोल पवार, आरशान पाठान, समाधान शिंगटे आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, खासदार निंबाळकर हे नागरिकांना भेटले नाहीत. माढा लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीने अभयसिंग जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी भाजपवर टीका केली. माढ्यातील मावळा ग्रुपच्या भाग्यश्री पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. माळशिरसमधील संजय देवगुंडे, यांनी महागाईवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्र सोडले. म्हसवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक विलास माने यांनी मनोगत व्यक्त करत अभयसिंग जगताप यांना उमेदवारीची मागणी केली. महादेव म्हासाळ, म्हणाले माढ्यात फक्त तुतारी वाजली पाहिजे. प्रतिभा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले आहे. (कार्यक्रम सुरु आहे)