करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला असून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. अजितदादा पवार यांना सुरुवातीपासून आमदार शिंदे हे नेते मानतात. त्यानंतर ते नेमके काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आमदार शिंदे यांनी आता अधिकृत भूमिका जाहीर केली असून आपला पाठिंबा हा ‘अजित पवार यांनाच आहे’, असे त्यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
आमदार शिंदे हे अजितदादा यांना नेते मनतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी अनेक कामे मंजूर करुन घेतली आहेत. मात्र त्याला स्थगिती देण्यात आली होती. आता ही स्थगिती उठेल अशी शक्यता आहे.