करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील करंजे येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी शेकडो मावळे उपस्थित होते. दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नंतर भगवा ध्वजारोहण करण्यात आले.
सायंकाळी जिल्हा परिषद शाळा येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यामध्ये लिंबू- चमचा, स्लो सायकलिंग, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा झाल्या. यातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता झाली. यानिमित्ताने मंगळवारी रक्तदान शिबीरही घेण्यात आले. यामध्ये 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ज्या शिवभक्तांनी रक्तदान केले आहे त्या शिवभक्तांना रक्ताची मोफत बॅग देण्यात आली. कामलाभवानी ब्लड बँकने यामध्ये विशेष सहकार्य केले.