करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मोरवड येथे मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मोरवड सकल मराठा समाज बांधव व बहुजन समाजाच्या वतीने जोपर्यंत सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा एकमताने ठरले आहे.
![Village ban on leaders for Maratha reservation in Morwad](https://kaysangtaa.com/wp-content/uploads/2023/10/Maratha-arkshna.jpg)
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४